मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

रॅफेल नदाल अंतिम फेरीत

WD
स्पेनच्या रॅफेल नदाल याने आपली विजयी घौडदौड कायम राखताना सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत त्याने चेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डेकचा 7-5, 7-6 (4) असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या नदालने ही स्पर्धा जिंकल्यास मोसमातील ते त्याचे नववे विजेतेपद असेल.

टेनिसच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असणाऱ्या नोवाक जोकोविचला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदविणाऱ्या जॉन इस्नरनेही अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेड्रोवर संघर्षपूर्ण लढतीत 6-7 (5), 7-6 (9), 6-3 अशा सेटमध्ये मात केली. या स्पर्धेत अगोदरच जोकोविच, अँडी मरे, रॉजर फेडरर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.