बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

रोम महिला टेनिस स्पर्धेत सानिया उपान्त्यपूर्व फेरीत

WD
भारताची सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची साथीदार बेथानी माटेक-सॅन्डस् या दोघींनी रोम महिला टेनिस स्पर्धेमध्ये उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. सहाव्या स्थानांवरील या जोडीने ईटली-ऑस्ट्रेलियाचा फ्रान्सेका-श्चियावोन आणि समंथा स्टोसूर या जोडीचा प्ले कोर्टावरील महिला दुहेरीत्या सामन्यात 6-4, 6-3 असा पराभव केला. या विजयासाठी सानिया- बेथानी यांना 1 तास 13 मिनिटांचा वेळ लागला. विजेत्या खेळाडूंनी 59 गुण मिळविले तर पराभूत खेळाडूंनी 47 गुण घेतले. सानिया- बेथानी या जोडीने 12 पैकी 5 वेळा ब्रेक पाँईंट मिळविले. आता, या दोघींपुढे पुढच्या फेरीत सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सी यांचे आव्हान राहणार आहे.