शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 मार्च 2013 (17:58 IST)

विजेंदर दोषी आढळल्यास कारवाई: क्रिडा मंत्रालय

FILE
ड्रग्ज प्रकरणात वादाच्या भोवर्‍यात अडकलेला ऑलिम्पिक ताम्र पदक विजेता विजेंदर सिंह दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे क्रिडामंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.

सद्या पंजाब पोलिस चौकशी प्रकरणाची करत असून कुणी दोषी आढळल्यास किंवा आरोपपत्र दाखल झाल्यास निश्चित कारवाई होईल.

राम सिंग याने ड्रग्ज घेतल्याचे कबूल केल्यानंतर त्यास राष्ट्रीय क्रिडा प्रबोधितीतून अगोदरच बडतर्फ करण्यात आले आहे. विजेदर सिंह याने याप्रकरणात आपला कसलाही सहभाव नसल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पंजाबमध्ये फतेहगढ साहीब येथे १३० कोटींची हेरॉइन सापडली होती आणि त्या फ्लॅटबाहेर विजेंदरच्या पत्नीच्या नावाने नोंदणी असलेली एसयूव्ही कार सापडल्यानंतर विजेंदरचे या प्रकरणात नाव गोवल्या गेले होते. (भाषा)