शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

विदेशी प्रशिक्षकांमुळे फायदा होईल - मेरी कॉम

PR
विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केल्यास महिला मुष्टियुद्धपटूंना फायदाच होणार असल्याचे मत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणार्‍या मेरी कॉमने येथे व्यक्त केले.

एका कार्यक्रमानिमित्त मुंबई शहरात आलेली मेरी कॉम प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाली, निश्चितच विदेशी प्रशिक्षकांची आम्हाला नितांत गरज आहे. मी भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात अनेक वर्षे सराव केला असून, आता ऑलिम्पिकनंतर आम्हाला विदेशी प्रशिक्षकांकडून नवे धडे घेण्याची गरज आहे.

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेपूर्वीच विदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करण्याची मेरीची इच्छा होती, परंतु क्रीडा मंत्रालयाने तिची मागणी नामंजूर केली. दुसरीकडे पुरुष मुष्टियोद्ध्यांना मात्र क्युबाचे बी. आय. फर्नाडिस यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ते द्रोणाचार्य पुरस्कार पटकावणारे पहिले विदेशी प्रशिक्षक बनले असून, गत दशकभरापासून ते भारतीय पुरुष मुष्टियोद्ध्यांना प्रशिक्षण देत आहेत.