शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मॉस्को , गुरूवार, 31 मे 2012 (11:05 IST)

विश्वनाथ आनंद पाचव्यांदा विश्वविजेता

आनंदी आनंद!

WD
भारताचा ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. आनंदने इस्त्रायलयच्या बोरिस गोल्फंड याचा टायब्रेकरमध्ये पराभव करून सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. आनंदने टायब्रेकरच्या 4 संघर्षपूर्ण रॅपिड गेम्सपैकी 2 गेम्समध्येविजय मिळवून पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. नियमित 12 सामन्यांनंतर दोघेही प्रत्येकी 6 गुणांसह बरोबरील राहिले होते. या विजयानंतर आनंदला 14 लाख डॉलर्स मिळणार आहे.

जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी पांढर्‍या मोहर्‍यांकडून विश्‍वनाथन आनंदला निव्वळ बरोबरी हवी होती. आणि गेल्या अनेक वर्षात आनंद पांढर्‍या सोंगट्यांनी क्वचितच हरला होता. आनंदचे जगज्जेतेपद निश्‍चित करणारा चौथा डाव सुरु झाला.
पुन्हा एकदा आनंदने सिसिलिअन बचावाच्या मुख्य प्रकारांना बगल दिली आणि उंटाचा शह दिला. ही पद्धत मोस्को पद्धत म्हणून ओळखली जाते. मुख्य म्हणजे या प्रकाराविरुद्ध जिंकणे काळ्य़ाला खूप कठीण जाते. सुरु वातीलाच वजिरावजिरी करून आनंदने गेलफांडच्या हल्ल्यातील हवाच काढून घेतली. गेलफांडकडे दोन उंटांचा वरचष्मा असला तरी डावात प्याद्यांची साखळी लावून आनंदने दोन्ही उंट जखडून ठेवले. यापुढे आपण टीकू शकणार नाही याची जाणिव होताच त्याने बरोबरीचा प्रस्ताव पुढे केला आणि आनंद २.५ वि. १.५ अशा गुणांनी पाचव्यांदा जगज्जेता ठरला.

आनंदला ६.५ कोटी.
या स्पर्धेसाठी एकूण २.५५ दशलक्ष डॉलर (सुमारे १३ कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम होती. १२ डावात आनंदने विजय मिळविला असता तर त्याला त्यापैकी ६0 टक्के रक्कम मिळाली असती. पण टायब्रेकरमध्ये निकाल लागल्याने आनंदला ५५ टक्के १.४ दशलक्ष डॉलर तर (सुमारे ६.५ कोटी) तर उर्वरित रक्कम गेलफांडला मिळाली.