शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

शारापोव्हा अंतिम फेरीत

WD
रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली.

मारियाने तीन सेटपर्यंत आणि बराच वेळ खेळल्या गेलेल्या पहिल्या उपान्तय सामन्यात बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिचा 6-1, 2-6, 6-4 असा पराभव केला. पहिला सेट मारियाने सहजपणे घेतला.

दुसरा सेट सहजपणे घेऊन अझारेन्काने 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक सेटही चुरशीचा ठरला. परंतु मारियाने तिसरा सेट जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.