शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

शारापोव्हा, क्विटोव्हा, नदाल दुसर्‍या फेरीत

WD
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत मारिया शारापोव्हासह तीन माजी महिला ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन टेनिसपटूंनी धडक मारली. ब्रिटनची युवा स्टार हीथर वॉटसनने सलामीच्या लढतीत चमकदार कामगिरी केली. पुरुष गटात राफेल नदालनेही पहिल्या विजयाची नोंद केली.

दुसर्‍या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने रोमानियाच्या अलेक्सांद्रा कडान्तूचा केवळ ४८ मिनिटांमध्ये ६-0, ६-0 ने धुव्वा उडवला.

विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. क्विटोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या अशलिग बार्टीवर ६-१, ६-२ ने सहज मात केली. दुसर्‍या फेरीत क्विटोव्हाला पोलंडची उर्ल्सला राडवान्स्का व फ्रान्सची पोलीन पारमेंटियर यांच्या दरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

पुरुष विभागात राफेल नदालने ६-२,६-२,६-१ असा सरळ सेटमध्ये सिमॉन बोलेलीचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. क्ले कोर्टचा राजा नदालने दमदार सुरुवात केली. स्पेनच्या डेव्हिड फेररने स्लोव्हाकियाच्या ल्युकास लाकोवर ६-३, ६-४, ६-१ ने सहज मात केली. यांको टिप्सारेव्हीच, फ्लोरियन मेयर, दिमित्री तुरसुनोव्ह आणि एडुवाडरे श्‍वांक हे टेनिसपटूही दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.