शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

शारापोव्हा दुसर्‍या फेरीत

WD
माजी विजेती रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिने फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.

तिने हेश सु-वेई हिचा 6-2, 6-1 असा पराभव केला. हा सामना जिंकणसाठी तिने 54 मिनिटांचा वेळ घेतला. दुसर्‍या स्थानावर असलेल्या शारापोव्हाने आठ सर्व्हिस गेममध्ये फक्त आठ गुण गमावले. हेशने तिला जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने सरळ दोन सेटमध्ये सहज विजय मिळविला.