शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (16:14 IST)

सानिया मिर्झाला मिळणार खेलरत्न

नवी दिल्ली- भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न‘ने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सानियाच्या नावाची शिफारस केल्यानंतर आता पुरस्कार समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
सध्या सानिया विलक्षण फॉर्मामध्ये आहे. सानियाने स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना, विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचं जेतेपद पटकावले. तसेच तिने यंदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळविले आहे. 
 
सानिया मिर्झाला 29 ऑगस्ट रोजी 'क्रीडा दिना'ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.