शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: वुहान : , शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2015 (07:39 IST)

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची स्विस साथीदार मार्टिना हिंगीस जोडीने वुहान खुल्या डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने पाचवे मानांकन प्राप्त अमेरिकेची कोप्स जोन्स आणि एबीगेल स्पीयर्स जोडीचा ६-२ आणि ६-२ असा दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दुसर्‍या फेरीत सानिया-हिंगीस जोडीने क्लाऊडिया आणि अनास्तासिया रोडियोनोव्हावर ६-३ आणि ६-२ अशी सहज मात केली होती. सानिया-मार्टिना जोडीने यंदाच्या सत्रात अमेरिकन आणि विम्बल्डन जेतेपदासह सहा स्पर्धा आपल्या नावावर केली असून विजयाचे सप्तक त्यांची वाट पाहत आहे.