गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

WD
भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवाल येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन 2013 बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी पराभव पत्करावा लागला. सायनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले. सायनाला चीनच्या ली हानने पराभूत केले.

सायनाने पहिल्या फेरीत थायलंडची सॅपसिरी ताएरात्तानाचाई हिला पराभूत केले होते, तर दुसर्‍या फेरीत तिने सिंगापूरची मिंगटियान फू हिला पराभूत केले होते. स्पर्धेचे तिसरे मानांकन देण्यात आलेली सायना उपांत्यपूर्व फेरीत विजयाची प्रबळ दावेदार मानली जात होती, परंतु बिगर मानांकित हानने शानदार उलटफेर घडविताना सायनाला 21-14, 15- 21, 21-12 असे पराभूत केले.