बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना नेहवाल लंडन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये

WD
WD
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दमदार खेळ करत लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीतून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये तीने आज डेर्न्माकची टीना बॉन हिचा २१-१५, २२-२० असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली २२ वर्षीय सायना नेहवाल पहिल्या गेम मध्ये चांगलीच लयीत होती. तिने आपल्यापेक्षा ११ वर्षांनी मोठी असलेल्या टीनास चूका करण्यास भाग पाडले. सायनाचा बॅकहँड, फोरहँड स्मॅश पाहण्यालायक होता. नेट कवरेज मध्येही ती टीनावर भारी पडली.

पहिल्या गेम मध्ये तिने ५-२ ची आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि स्कोअर ८-२ करत आपला पक्ष मजबूत केला. येथे टीना ने काही चांगले ड्रॉप शॉट खेळले आणि स्कोअर १२-८ केला. एकवेळी सायना २०-१२ ची आघाडी घेऊन गेम जिंकण्याच्या तयारीत होती. टीना ने तीन मॅच पॉइंट वाचवाले, मात्र ती सायनास २१-१५ ने गेम जितन्यापासून वाचवू शकली नाही.

टीना ने दुसर्‍या गेम मध्ये आपल्या व्युवरचनेत बदल केला आणि ४-३ आघाडी घेतली. १०-१० वर सायनाने बरोबरी केली ती १५-१५ स्कोअर पर्यंत कायम राहिली. टीना ने सलग तीन अंक घेऊन आघाडी १८-१५ वर पोहचवली. १८-२० स्कोअर वर ही लढत तिसर्‍या गेम पर्यंत पोहचेल असे वाटत होते मात्र सायना ने जोरदार स्मॅश ने स्कोअर २०-२० वर आणून ठेवला. यानंतर आपल्या सर्व्हिस वर २ अंक घेत २२-२० ने गेम आणि सामना जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. टीना ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन राहून चूकली आहे आणि वाढत्या वयातही तिने सायना समोर कडवे आव्हान ठेवले.

फायनल मध्ये सायनाचा मुकाबला चीनची जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची वेंग हांग हिच्यासोबत होईल. सायना व वेंग यांच्यात आतापर्यंत पांच लढती झाल्या आहे, मात्र सायना एकही मुकाबला जिंकू शकलेली नाही. सायना ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमधून सेमीफायनल मध्ये पोहचणारी पहिली खेळाडू बनली आहे. (वेबदुनिया न्यूज)