मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2016 (12:46 IST)

सिडनी इंटरनॅशनलमध्ये सानिया-मार्टिनाला जेतेपद

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगिसने गुरुवारी डब्लूटीए सिडनी इंटरनॅशनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना सलग २९ विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला. या जोडीने २२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. सानिया व मार्टिना या जोडीने गुरुवारी सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात रॅलुका ओलारू-यारोस्लावा श्‍वेडोवा यांचा ४-६, ६-३, १०-८ असा पराभव करत हा विक्रम प्रस्थापित केला. हीजोडीने अंतिम फेरीत स्थान मिळवत आणखी एका विजेतेपदाजवळ पोचली आहे. या दोघांनी २२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. 
 
या दोघींनी १९९४ मधील गिगी फर्नांडेझ-नताशा झ्वेरेवा यांचा सलग २८ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. सानिया-हिंगीस यांनी चीनची चेन लियांग-शुआई पेंग यांच्यावर ६-२, ६-३ अशी मात करून या विक्रमाची बरोबरी केली होती. उपांत्यपूर्व फेरीतील विजयाने सानिया-मार्टिनाने अमेरिकेच्या गिगि फर्नाडेझ आणि बेलारुसच्या नताशा वेरेरा यांच्या १९९४ मधील सलग २८ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. मात्र अंतिम फेरी गाठताना ‘नंबर वन’ जोडीने फर्नाडेस-वेरेरा यांचा २२ वर्षापूर्वीचा विक्रमही मोडीत काढला. 
 
२०१५ वर्षातील सवोत्कृष्ट जोडी ठरलेल्या सानिया-मार्टिनाने अमेरिकन ओपन आणि विम्बल्डनसह ९ डब्लूटीए जेतेपद पटकावली. गेल्या आठवड्यात झालेली ब्रिस्बेन इंटरनॅशनल जिंकून या जोडीने नव्या वर्षातही दमदार सुरुवात केली. ब्रिस्बेन पाठोपाठ सिडनी इंटरनॅशनलच्या अंतिम फेरीत धडक मारताना सानिया-हिंगिसने सातत्य राखले. या जोडीच्या दृष्टिक्षेपात आता अकरावे जेतेपद आहे.सानिया आणि मार्टिन या जोडीने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले तर ते त्यांच्या कारकिर्दीत एकत्रपणे मिळविलेले ११ वे विजेतेपद असणार आहे. या वर्षाची सुरवात त्यांनी विजेतेपदानेच केली होती. या दोघींनी ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.