शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सुपर किंग्जसमोर लॉयन्सचे आव्हान

सिडने सिक्सरविरुद्ध पहिल्या लढतीत 14 धावांनी पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर दुसर्‍या लढतीत आज लॉयन्सचे आवाहन आहे. ग‍तविजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला. फुल्ल फॉर्मात असलेल्या लॉयन्सविरुद्ध सुपर किंग्जला छोटीशी चूकही महागात पडू शकेल.

सिडने सिक्सर्सविरुद्ध 185 धावांचा पाठलाग करताना सुपर किंग्जने 171 धावांचा पल्ला गाठला, पण फाफ डु प्लेसिस (43) आणि सुरेश रैना (57) वगळता इतर फलंदाजांनी पाट्या टाकण्याची कामे केली. त्याच्या फटका चेन्नईला बसला. बद्रीनाथ, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, रवींद्र जडेजा दुहेरी आकाडाही गाठू शकले नाहीत. बेन हॉल्फिनहॉस, बॉलिंगर, आर. अशिवन हे गोलंदाजही प्रभावी ठरले नाहीत. सेमीफायनलचा मार्ग खडतर करायचा नसेल तर सुपर किंग्जच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावीत लागणार आहे. दुसरीकडे लॉयन्सने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सला पाणी पाजले होते. आता चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. अर्धशतक ठोकणार्‍या कॉक आणि मॅकॅन्झीकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा लॉयन्सला असेल.