शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सुशील कुमारला रौप्य, सुवर्ण जपानच्या झोळीत

PTI
लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या ६६ किलोग्रॅम फ्री स्टाईल कुस्तीत भारताचा सुशील कुमार जपानच्या तात्सुहिरो योनीमित्सुकडून ४-१ ने पराभूत झाला. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्ण जपानच्या झोळीत गेले.

सुशील कुमारचा प्रवास: सुशील कुमारने पूर्व क्वार्टर फायनलमध्ये तुर्कस्थानच्या रमजानचा ३-१ ने, क्वार्टर फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या पहलवानाचा ६-३ ने तर सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानचा पहलवानाचा पराभव करून फायनल मध्ये दाखल झाला होता.

तात्सुहिरोचा प्रवास: २६ र्षीय तातुहिरो २००९ मध्ये जागतिक कुस्तीत कांस्य, २००९ मध्ये आशियन खेळांमध्ये सुवर्ण, २०११ मध्ये विश्व कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. लंडन ऑलिम्पिकच्या पूर्व क्वार्टर फायनलमध्ये त्याने क्यूबाच्या लिवान यास २-१ ने, क्वार्टर फायनलमध्ये कॅनडाच्या वीरन्स गार्सियास ६-१ ने तर सेमीफायनलमध्ये अजरबेजानच्या हासनोव यांस ३-० ने हरवून फायनल मध्ये प्रवेश केला होता.

सुशील कुमारचा परिचय: २६ मे १९८३ मध्ये दिल्लीलगत नजाफगढ येथे सुशील कुमारचा जन्म झाला. त्याचे आजोबा, वडिल व थोरला भाऊही पहलवानी करायचे. सुशीलने सातव्या वर्गापासूनच आखाड्यात जाऊन कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरूवात केली होती. महाबली सतपाल, यशवीर व रामफल यांनी सुशीलला कुस्तीच्या कलेत पारंगत केले. १९९८ मध्ये विश्व कॅडेट खेळांत त्याने सुवर्ण जिंकून पहिले यश मिळविले. १९९९ मध्ये एकदा परत त्याने ही कामिगिरी केली. ६६ किलोग्रॅम वर्गात सुशील पहिल्यांदा बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत तेव्हा तो कांस्य पदक मिळवेल, याचा कुणास अंदाजही नव्हता. यानंतर तो लंडनमध्ये सुवर्णाची कमाई करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती.

१९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदा केडी जाधव यांनी कांस्य पदक जिंकले होते. सुशील कुमार याने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांत पदक जिंकण्याचा इतिहास रचला आहे.

महाबली सतपाल यांच्या मुलीसोबत विवाह: सुशील कुमार बीजिंग ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकल्यानंतर आपले गुरू महाबली सतपाल यांच्या मुलीसोबत विवाहबद्ध झाला होता. सुशील आपला जावई बनावा, अशी सतपाल यांची इच्छा होती.

पुरस्कार:
सुशील कुमार यांस २००६ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ मध्ये त्याला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(वेबदुनिया न्यूज)