गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सुशील कुमार वाहणार ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज

लंडन ऑलिम्पिकमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता पहेलवान सुशील कुमार भारतीय ध्वजवाहकाची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

FILE
आयओएचे कार्यवाहक अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी लंडन ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंसाठी ओएनजीसीने आयोजित केलेल्या शुभेच्छा समारंभात ही घोषणा केली. कार्यक्रमास केंद्रीय क्रिडामंत्री अजय माकन आणि आयओएचे सरचिटणीस रणधीर सिंह सुद्धा उपस्थित होते.

२७ जुलैला होणार्‍या खेळाच्या महाकुंभात उद्घाटन समारंभात भारतीय ध्वज वाहण्यासाठी सुशील व्यतिरिक्त नेमबाज अभिवन बिंद्रा, मुष्टियोद्धा विजेंद्र सिंह शर्यतीत होते. मात्र बिंद्रा आणि विजेंद्र यांना उद्धाटनाच्या दुसर्‍याच दिवशी लढतीसाठी उतरावे लागणार असल्याने या भूमिकेसाठी सुशीलची निवड झाली आहे. बिंद्रा, विजेंद्र आणि सुशीलने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंगा फडकावला होता. महाकुंभाच्या इतिहासात व्यक्तिगत सुवर्ण जिंकणारा बिंद्रा हा पहिला खेळाडू बनला होता. सुशील आणि विजेंद्रने अनुक्रमे कुश्ती आणि मुष्टियुद्धात कांस्य जिंकले होते. सुशील विश्व विजेताही राहिला आहे. (वृत्तसंस्था)