शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सेरेनाने चौथ्यांदा जिंकला यूएस ओपन

WD
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टोरिया अझारेंकाचा पराभव करत विजेतेपद मिळविले.

सेरेनाचे हे चौथे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद आहे. तर तीने पंधराव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. सेरेनाने अझारेंकाचा ६-२, २-६, ७-५ असा पराभव केला.

या विजेतेपदानंतर करंडक स्वीकारताना सेरेना म्हणाली, ''मी जिंकले, याच्यावर मला विश्वास बसत नाही. अझारेंका चांगली खेळत असल्याने मी उपविजितेपद मिळेल, अशी तयारी केली होती. पण, मला विजय मिळाल्याने धक्काच बसला आहे.