शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सेरेना ऑस्ट्रेलिया ओपनमधून बाहेर

जोकोविक उपांत्यपूर्व फेरीत दाखल?

WD
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या अँना इव्हानोविकने सेरेनाचा ४-६, ६-३, ६-३ असा पराभव केला, तर दुसरीकडे आघाडीचा टेनिसपटू नोवाक जोकोविकने सलग चौथा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या अँना इव्हानोविकने ४-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदांसाठी खेळत असलेल्या सेरेनाला वर्षातील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला. इव्हानोविकने पहिल्या सेटमध्ये पराभव स्वीकारूनही दुसर्‍या आणि तिसर्‍या सेटमध्ये सेरेनावर वर्चस्व गाजवले. अखेर या स्पर्धेतील सर्वात मोठा अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. या पराभवानंतर बोलताना अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स म्हणाली की, पाठीच्या दुखापतीनंतर मी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा विचार केला होता. अँनाविरोधातल्या सामन्यात मी खूप चुका केल्या. चुकीची सर्व्हिस केली. याचमुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले, तर पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत जोकोविकने लागोपाठ चौथा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने सर्बियाचा खेळाडू रॉड लॅवर अँरेनाचा १ तास ३३ मिनिटांत ६-३, ६-0, ६-२ अशा तीन सेटमध्ये पराभव केला. त्याची पुढील लढत स्टेनिस्लास वॉवरिंका आणि टॉमी रोबरॅडा यांच्यातील विजेत्याशी होईल.