गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सॉरी फेडरर, 'त्या' ब्लॉगरने माफी मागितली

जीवे मारण्याची धमकी देणार्‍या चिनी ब्लॉगरने अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररची माफी मागितली आहे. 'ब्ल्यू कॅट पोलिथेइस्टिक रिलीजन फाऊंडर 07' असे लांबलचक नाव धारण करणार्‍या या ब्लॉगरने शंघाय ओपन प्रारंभ होण्याच्या दोन दिवस आधी फेडररला मारण्याची धमकी दिली. यामुळे टेनिसजगतात खळबळ उडाली होती व शंघाय ओपनमध्ये फेडररला कडक सुरक्षा देण्यात आली.

मी संबंधित लोकांची माफी मागितल्याने मला अटक करण्यात आली, असे या ब्लॉगरने बायडू डॉट कॉम वर लिहिले आहे. फेडररला धमकी देताना ब्लॉगरने फेडररचे टेनिस कोर्टवर खाली पडतो आहे, असे रेखाचि‍त्रही टाकले होते. या सगळ्या प्रकारामुळे फेडररही काही काळ विचलित झाला होता आणि मनोधैर्य खचल्याचे कबूल केले होते.