शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

'डेन्मार्क ओपन'वर सायनाचा कब्जा!

WD
लंडन ऑलिम्पिकनंतर जवळपास दोन महिन्यांनी बॅडमिंटन कोर्टवर उतरणार्‍या 22 वर्षीय सायनाने डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत जर्मनीची सहावी मानांकित ज्युलियन शेंकला केवळ 35 मिनिटांतच 21-17, 21-8 असे पराभूत करून चार लाख डॉलर्स पुरस्कार रकमेच्या या स्पर्धेतील 30 हजार डॉलर्सचे विजेतेपद पटकावले. शेन्कविरुद्धचा नऊ सामन्यांतील हा सायनाचा सहावा विजय ठरला, तर तीनमध्ये शेन्कने बाजी मारली.

विजेतेपद पटकावल्यानंतर सायना म्हणाली, ऑलिम्पिकनंतर मी स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याच्या पूर्ण प्रयत्न केला, पण शेवटी प्रत्येक स्पर्धाही एक आव्हान असतेच. त्यातच माझ्या उजव्या गुडघ्याची दुखापत त्रासदायक ठरत होती, मात्र मला ही स्पर्धा जिंकण्याची शक्ती मिळाली.