गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Updated :साओ पोलो , शुक्रवार, 13 जून 2014 (11:32 IST)

FIFA 2014: ब्राझीलच्या विजयी किकने फुटबॉलच्या महाकुंभाला प्रारंभ

यजमान ब्राझीलच्या विजयी किकने 20 व्या फीफा  वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ झाला. ब्राझीलने आपल्यापेक्षा दुबळ्या   क्रोएशियाचा 3-1 असा धुव्वा उडवला. स्टार खेळाडू नेमारने  जबरदस्त दोन गोल करून आपल्या संघाला मोलाचे योगदान दिले.  नेमारच सामन्याचा हिरो ठरला. तसेच ऑस्करने एक गोल केला.
 
पाच वेळा वर्ल्‍डकप विजेता असलेल्या ब्राझील विरोधात क्रोएशियाने  दमदार सुरूवात केली. पहिल्या हाफच्या 11 व्या मिनिटांमध्‍ये  मार्सिलोने गोल केला. त्याने क्रोएशियाला 1-0 ने लीड दिली.  मार्सिलोचा गोल रोखण्‍याचा ब्राझीलच्या खेळाडूंनी खूप प्रयत्न केला,  परंतु त्याला यश मिळाले नाही. 

फॉर्ममध्‍ये आले नेमार
ब्राझीलचा स्टार खेळाडू  नेमारच्या गोलने अन्य खेळाडूंची झोप  उडवली. नेमारने हाफच्या 29 व्या मिनिटाला गोल केला. या  प्रकारे ब्राझीलने क्रोशियाची 1-1 अशी बरोबरी केली.त्यांने दुसरा  गोल हा पेनल्टी शूटमधून केला. ब्राझीलचा दुसरा खेळाडू ऑस्कर  याने तिसरा गोल केला आणि ब्राझीलला यंदाच्या स्पर्धेतील पहिला  विजय मिळवून दिला.