संबंधित माहिती
- हॉकी इंडिया कडून भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्य राष्ट्रीय शिबिरासाठी ३६ संभाव्य खेळाडू जाहीर
- कांस्यपदक विजेता गुरजंत सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली
- एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ साठी भारत आणि पाकिस्तान ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा आमने सामने येतील
- FIH Pro League: भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलिया कडून पराभव
- FIH Pro League: भारतीय पुरुष हॉकी संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर
हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. सलीमा टेटे कर्णधार असेल आणि संघ २६ मे पासून चार सामन्यांची मालिका खेळेल.
हॉकी इंडियाने सोमवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ मे पासून चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील सर्व चार सामने पर्थ हॉकी स्टेडियमवर खेळले जातील. पहिला सामना २६ मे रोजी, दुसरा २७ मे रोजी, तिसरा २९ मे रोजी आणि अंतिम सामना ३० मे रोजी खेळला जाईल. १५ ते २१ जून दरम्यान ऑकलंड येथे होणाऱ्या एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अर्जेंटिनामध्ये केलेल्या शानदार कामगिरीनंतर भारतीय संघ या दौऱ्यावर रवाना होत आहे. भारतीय संघ आगामी व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगामाच्या तयारीसाठी बंगळूरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) राष्ट्रीय शिबिरात आपल्या खेळातील महत्त्वाच्या पैलूंना अधिक धार देण्यासाठी कठोर सराव करत आहे.
२०२२ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सलीमा टेटे आगामी दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व करेल. तिच्या संघात सविता, सुशीला चानू पुखरामबम, लालरेम्सियामी आणि नवनीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबतच सोनम, हीना बानो आणि लालथंतुलंगी यांसारख्या उदयोन्मुख युवा खेळाडूंचाही समावेश असेल.
सविता आणि बिचू देवी खारीबाम गोलरक्षण विभागात विश्वसनीय पर्याय असतील. बचावफळीत, निक्की प्रधान, इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंतुआंगी आणि ज्योती या शिल्पी डबाससोबत खेळतील, जिला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात बोलावण्यात आले आहे. लालथंतुआंगीलाही पहिल्यांदाच वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. सलीमा टेटे नेहा आणि लालरेम्सियामी यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबत मध्यफळी विभागाचे नेतृत्व करेल, तर साक्षी राणा आणि सुनीता टोप्पो आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील. दीपिका सोरेंग आणि सोनम, ज्यांनी अद्याप वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही, त्यांचाही मध्यफळीत समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया २०२६ दौऱ्यासाठी भारताचा २२ सदस्यीय संघ
गोलरक्षक : सविता, बिचू देवी खरीबम
बचावपटू: निक्की प्रधान, इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंतुलंगी, ज्योती, शिल्पी दाबस
मिडफिल्डर: सलीमा टेटे, लालरेमसियामी, नेहा, साक्षी राणा, सुनीता टोप्पो, दीपिका सोरेंग, सोनम
फॉरवर्ड: नवनीत कौर, बलजीत कौर, दीपिका, अन्नू, इशिका, हिना बानो, रुतुजा दादासो पिसाळ
Edited By - Priya Dixit
