संबंधित माहिती
- प्रीती पवारने आशियाई बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इमला पराभूत केले
- Asian Boxing Championship: निखत-प्रिया आणि प्रीती उपांत्य फेरीत दाखल
- प्रीती-दीपक यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजयाने सुरुवात केली, निखत-लोव्हलिना यांना बाय मिळाला
- एमसी मेरी कोम व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करू शकते स्वतःच दिले संकेत
- भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांची आशियाई बॉक्सिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती
लक्ष्य फोगटचा आशियाई बॉक्सिंग अंडर-17 चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश
आशियाई १७ वर्षांखालील बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारचा दिवस भारतासाठी आव्हानात्मक होता. लक्ष्य फोगाट हा एकमेव खेळाडू अंतिम फेरीत पोहोचला,
तर उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे इतर चार बॉक्सर्सना कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. ७५ किलो वजनी गटात, लक्ष्यने कोरियाच्या सेउंगमिन लीचा ५-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत नरेंद्र नेला (46 किलो) याला उझबेकिस्तानच्या अब्दुल्लाख नुरालिव्हने 5-0 ने पराभूत केले. यश यादव (50 किलो) मंगोलियाच्या एस. उसुखबातरकडून 4-1, तर निवेश पालला 54 किलो गटात उझबेकिस्तानच्या अब्दुलबोसित युरसनबोएवकडून 5-0 ने पराभव पत्करावा लागला. नमन (७० किलो) उझबेकिस्तानच्या अब्दुवोहिद अब्दुमाझिदोव्हकडून ३-२ असा पराभूत झाला.
Edited By - Priya Dixit
