विनेश फोगट यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने डब्ल्यूएफआयला नोटीस बजावली, पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) नोटीस बजावली आहे. WFI ने अलीकडेच विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावून, तिला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास अपात्र ठरवले होते. विनेशने या नोटीसला आव्हान दिले होते, ज्यावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
डब्ल्यूएफआयने अलीकडेच विनेशला गैरशिस्त आणि उत्तेजक विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली नोटीस पाठवली होती.
एवढंच नाही तर, UWW च्या उत्तेजक-विरोधी नियमांनुसार निवृत्तीतून परतल्यानंतर आवश्यक असलेला सहा महिन्यांचा नोटीस कालावधी न दिल्यामुळे विनेशला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले.
UWW ने आपल्या पत्रात हे देखील स्पष्ट केले होते की, जर विनेशला कुस्तीमध्ये परतायचे असेल, तर तिला किमान सहा महिने आधी ITA किंवा आंतरराष्ट्रीय महासंघाला कळवावे लागेल आणि या कालावधीत उत्तेजक-विरोधी चाचणीसाठी उपलब्ध राहावे लागेल.
१५ पानी नोटीसमध्ये, डब्ल्यूएफआयने असा आरोप केला होता की विनेशच्या वर्तनामुळे राष्ट्रीय नामुष्की ओढवली असून भारतीय कुस्तीची प्रतिमा डागाळली आहे.
डब्ल्यूएफआयने विशेषतः नमूद केले होते की, विनेश यावर्षी २६ जूनपर्यंत कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत भाग घेण्यास पात्र नाही, ज्यामध्ये १० ते १२ मे दरम्यान गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेचाही समावेश आहे.
विनेश डब्ल्यूएफआयच्या निर्णयावर नाराज होती आणि तिने कारणे दाखवा नोटीस तसेच आगामी खेळांसाठीच्या चाचण्यांमधून तिचे नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. विनेशच्या याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आणि पुढील सुनावणी ६ जुलै रोजी निश्चित केली.
Edited By - Priya Dixit
