बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 15 सप्टेंबर 2011 (14:50 IST)

आधी 25,000 नंतर दीड लाखचे बक्षीस!

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या भारतीय हॉकी इंडियाचे बक्षीस नाकारल्यानंतर हॉकी संघावर पुरस्कारांचा वर्षाव, क्रीडा मंत्रालयाने दिले प्रत्येकी दीड लाख, पंजाब सरकारकडूनही २५ लाख रुपये मिळतील, अशी घोषणे केली.

हॉकी इंडियाच्या या आगाऊगिरीवर क्रीडामंत्री अजय माकन यांनीही टिका केली. ' हॉकी इंडियाने खेळाडूंना बक्षीस जाहीर करण्यापूर्वी सरकारशी चर्चा केली असती तर सरकारकडून देण्यात येणारे दीड लाख आणि ते २५ हजार अशी एकत्रित रक्कम खेळाडूंना देता आली असती', असे सांगत माकन यांनी बचावाचा पवित्रा घेतला .

आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्याला तीन लाख रुपये आणि संघातील प्रत्येकाला दीड लाख रुपये देण्याचा नियम आहे. त्यामुळे हॉकी खेळाडूही त्यासाठी पात्र होतेच. हा नियम नवा नाही. खेळाडूंचा या रकमेवर हक्क असून येत्या एक - दोन दिवसांत खेळाडूंना या रकमेचे धनादेश मिळतील, असे माकन यांनी स्पष्ट केले .