शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

इंडियन वेल्स जेतेपदावर रॉजर फेडररचा कब्जा

WD
जागतिक तिसर्‍या क्रमांकावरील टेनिसपटू रॉजर फेडरर याने जॉन इस्नेर याचा 7-6 (9-7), 6-3 असा पराभव करून इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या जेतेपदाबरोबरच फेडरर याने सलग तीन स्पर्धांचे अजिंक्यपद पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे तर इंडियाना वेल्सवर त्याने चौथ्यांदा आपल्या विजेतेपदाचे नाव कोरले आहे. यापूर्वी जीमी कॉनर्स आणि मायकेल चँग या दोघांनाच इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेचे तीन वेळा अजिंक्यपद मिळवता आले आहे. फेडरर याने या दोघांना मागे टाकून नवा इतिहास घडवला आहे.