मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 9 एप्रिल 2012 (11:57 IST)

इंडिया ओपनसाठी सायनाला मिळाले तिसरे मानांकन

WD
स्वीस ओपन ग्रां. प्री. मध्ये सुवर्णपदक मिळविल्याने आत्मविश्वास दणावलेल्या भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला 24 ते 29 एप्रिलदरम्यान सिरिफोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार्‍या ओसिम बीडब्ल्यू एक वर्ल्ड ‍सीरिज अंतर्गत होणार्‍या दुसर्‍या योनॅक्स सनराईज इंडिया ओपन स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाला इंग्लंडमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात येत आहे.

2 लाख डॉलर्स पुरस्कारांच्या इंडिया ओपनमध्ये चीनच्या शिजिऑन वाँगला पहिले तर ली जुरईला दुसरे तसेच याजियाओ वाँगला चौते मानांकन देण्यात आले आहे. सायनाने काही आठवड्यापूर्वी पहिल्या स्वीस ओपनच्या फायनलमध्ये शिजिआनला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपद मिळविले होते.