शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 22 डिसेंबर 2011 (13:19 IST)

ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सानिया मिर्झाची तयारी सुरू

2012 या वर्षातील पहिली ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने लक्ष केंद्रित केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी आपण तयारी करत असून त्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. पण ही स्पर्धा सुरू होण्यास अद्याप खूप वेळ आहे.

त्यामुळे या दरम्यानाच्या काळात काहीही घडू शकते, असे फोरम ऑफ इंडियन मर्चंटस चेंबरने आय‍ोजित केलेल्या वार्तालाप समारंभात बोलताना सानियाने सांगितले.