गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

काय भारताला गोल्ड मेडल मिळवून देईल सिंधू?

भारतात बॅडमिंटनचे नाव घेतलेल्याबरोबर मनात सायना नेहवालचे नाव येतं. त्यानंतर इतर खेळाडूंचे. परंतू सध्या रिओ ऑलिंपिकमध्ये देशाला पीव्ही सिंधू हिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पी. व्ही. सिंधूने ऑलिंपिक बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील भारताच्या आशा कायम राखताना लंडन ऑलिंपिकमधील उपविजेती वँग यिहानचा 22-20, 21-19 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
वँग यिहानला परास्त करणे एक मोठे यश आहे कारण जागतिक क्रमवारीत 2 वँग दोनदा विश्व चॅम्पियन राहून चुकली आहे. आता सेमीफायनलमध्ये सिंधूचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहारा हिच्यासोबत होणार आहे. ओकुहारा जागतिक क्रमवारीत 3 रँकिंग पर्यंत पोहचून चुकली आहे, जेव्हाकि सिंधूची सर्वोच्च रँकिंग 9 आहे. हा एक रोमांचक सामना असेल.
 
पीव्ही सिंधू हरवून चुकली आहे ओकुहाराला
रिओ ऑलिंपिकच्या सेमीफायनलमध्ये एकमेकासमोर येणार्‍या या दोन्ही खेळाडूंचा सामना 2012 मध्ये यूथ अंडर-19 स्पर्धाच्या फायनलमध्ये झाला होता. या सामान्यात सिंधूने ओकुहाराचा पराभव केला होता.
 
सिंधूकडे पूर्ण देश आशेच्या नजरेने पाहत आहे. क्वार्टर फायनलमध्ये स्वत:च्या खेळाने तिच्या आत्मविश्वास वाढला असेलच. म्हणूनच भारतासाठी गोल्ड मेडल जिंकू शकते अशी अपेक्षा केली जात आहे.