गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 12 जुलै 2011 (15:10 IST)

खेळाडूंनाही ‘भारतरत्न’ मिळावा : अजय माकन

केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी आज मागणी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करून देशाचे नाव उंचावणार्‍या खेळाडूंनाही ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळायला पाहिजे.

माकन यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना याबाबत एक पत्रदेखील लिहिले आहे. ‘‘हा पुरस्कार देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रांत क्रीडा विभागाचा समावेश नाही, ही बाब दुर्दैवी आहे. यामुळेच आजपर्यंत एकाही खेळाडूला हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळू शकला नाही,’’ असे माकन यांनी नमूद केले.