शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सिडनी , शुक्रवार, 29 जानेवारी 2016 (13:51 IST)

ग्रँडस्लेम हॅट्रिक : सानिया मार्टीनानं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद

सानिया आणि मार्टिना हिंगिसची जोडी प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन चँपियन बनली आहे. सानिया मार्टिना जोडीने जिंकलेले हा सलग तिसरे ग्रँड स्लॅमही आहे. महिला दुहेरीचे पहिले मानांकन असलेल्या या जोडीने  अँड्री लवाकोवा व ल्युसिया हार्देका या जोडीचा ७ - ६, ६ -३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे. 
 
यापूर्वीचा महिला मिश्र जोडीचा विक्रम जाना नोवोतना व हेलेना सुकोवा या जोडीच्या नावावर असून १९९० मध्ये या जोडीने ४४ सामने जिंकले होते. हा विक्रम मोडण्यासाठी सानिया मार्टिना जोडी अवघे ८ सामने दूर आहे. 
 
गेल्या वर्षी जागतिक टेनिस संघटनेने सानिया मार्टीनाला डबल्स टीम ऑफ दी इयरने गैरवले आणि तेव्हापासून या दोघी अपराजित राहिल्या आहेत. सँटिना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीने ४६पैकी ४३ सामने जिंकले असून यामध्ये युएस ओपन, गुंगझू, वुहान, बीजिंग, सिंगापूर, ब्रिस्बेन व सिडनी येथील विजेतेपदांचा समावेश आहे.
 
ऑस्ट्रेलियन ओपन ही माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, ही ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लँमसारखीच आहे असं सांगणा-या सानियाने मार्टिना हिंगीसचं कौतुक करताना, ती एक चँपियन खेळाडू असून तिच्यासोबत खेळायची संधी मिळणं हा समाधानाचा भाग असल्याचे उद्गार काढले आहेत.
तर, मार्टिनानेही सानियाचे आभार मानताना, ही अत्यंत खडतर स्पर्धा होती, आणि तुझ्याखेरीज इथपर्यंत पोचता आलं नसतं असं सांगत तिचं कौतुक केलं आहे.
 
2015मध्ये सानियालेले यश   
2015मध्ये सानिया मिर्ज़ा बनली डबल्सची वर्ल्ड नंबर 1 खेळाडू    
2015 सानिया-हिंगिसची जोडी वर्ल्ड नंबर 1 बनली  
2015 सानियाने जिंकले 10 WTA किताब  
2015 राजीव गांधी खेल रत्न सम्मान
2016 पद्म भूषण