गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2011 (11:57 IST)

चांगल्या कामगिरीचा कार्तिकेयनला विश्वास

मायदेशात पहिल्यांदा होत असलेल्या फॉर्म्युला वन कार रेसिंगमध्ये अपेक्षांचा दबाव असला तरी विचलीत न होता आपण चांगली कामगिरी करू, असा विश्वास भारतीय चालक नारायण कार्तिकेयनने व्यक्त केला आहे.

'भारतात पहिल्यांदाच ही रेस होत असल्याचे सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे असेल याची मला जाणीव आहे. मात्र अपेक्षांचा दबाव कामगिरीवर होणार नाही, याची काळजी घेईन, अशी ग्वाही त्याने दिली आहे. कार्तिकेयन या रेसमध्ये हिस्पानिया संघाकडून सहभागी होत आहे.