गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: फुजोऊ , सोमवार, 17 नोव्हेंबर 2014 (11:43 IST)

चायना ओपन किताबावर श्रीकांतची मोहोर

युवा स्टार श्रीकांत या भारताच्या बॅडमिंटन पटूने चायना ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचा किताब पटकावला आहे. या किताबावर आपली मोहोर उमटवून श्रीकांतने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवीन इतिहास रचला आहे. 
 
श्रीकांतने अप्रतिम कामगिरी करत दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि पाच वेळा विश्‍वविजेता ठरलेला लिन डॅन याचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीचा हा अंतिम सामना ४६ मिनिटे चालला. श्रीकांतचा हा पहिलाच सुपर सीरिज किताब आहे.  
 
श्रीकांतने कडव्या लढतीत सुरुवातीला ११-७ अशी आघाडी मिळवली होती; पण लिनने पुनरागमन करून गुणांतील हा फरक ११-१0 वर आणला. श्रीकांतच्या ट्रिपल आणि जोरदार स्मॅशपुढे लिन निष्प्रभ ठरला. त्यानंतर श्रीकांतने १४-१२ अशी आघाडी घेतली.

त्यानंतर लिनने १९-१७ अशी पुन्हा आघाडी घेतली; पण दबावाखाली न येता श्रीकांतने दोन गुणांनी आघाडी घेतली. दुसर्‍या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या सवरेत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवले.

दोघांनी ८-८ अशी बरोबरी साधल्यानंतर श्रीकांतने ११-९ अशी बढत मिळवली; पण त्यानंतर सामना १२-१२ असा बरोबरीत आला. त्यानंतर हा सामना रोमांचक होत गेला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी १५-१५ अशी बरोबरी साधली; पण श्रीकांतने त्यानंतर चार गुणांची आघाडी घेतली. लिनने एक पॉईंट वाचवला; पण श्रीकांतने पुढील गुण मिळवून भारतीय बॅडमिंटन इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.