गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: रिओ दे जेनेरिओ , गुरूवार, 19 जून 2014 (10:47 IST)

चिलीशी पराभूतहून गतविजेता स्पेन स्पर्धेबाहेर

गत विजेता स्पेनचा चिलीने २-० असा पराभव करत स्पेनला स्पर्धेबाहेर घालवले आहे.  पहिल्यापासूनच आक्रमक खेल करणा-या चिलीच्या वर्गासने १९ व्या मिनिटाला गोल करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.

अनेक प्रयत्न करूनही स्पेनच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. नेहमी आक्रमक पवित्र्यात असणा-या स्पेनच्या संघाने चिली पुढेशरणागती पत्करल्याचे त्यांच्या खेळातून दिसून येत होते. ४३ व्या मिनिटाला अरंगेने ने गोल करत स्पेनच्या प्रेक्षकांना हादरा दिला आणि आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मध्यंतरापूर्वी  २-० अशी आघाडी घेतलेल्या चिलीने मध्यंतरानंतरही चांगला खेळ करत स्पेनला एकही गोल न करू दिल्याने गतविजेत्या स्पेनवर पराभवासोबतच स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.