शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (12:06 IST)

ज्वाला-अश्विनीची क्रमवारीत घसरण

जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताची दुहेरीतील स्टार तारका ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पाने 12व्या स्थानी घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्वाला-अश्विनी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत तर जपान ओपनमध्ये त्यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडळाला होता. याआधी ज्वाला-अश्विवीन जोडी 10व्या स्थानी विराजमान होती. स्टार बॅ‍डमिंटनपटू सायना नेहवाल महिला एकेरीत अव्वलस्थानी कायम आहे. पीव्ही सिंधू 13व्या स्थानी आहे. पुरुष दुहेरीमध्ये मनु अत्री व बी सुमित रेड्डी 20व्या स्थानी आहे. एकेरीत के प्रणॉय 16व्या स्थानी कायम आहेत.