शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2016 (11:45 IST)

दीपा करमाकर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली

भारताची जिमनॅस्ट दीपा करमाकरने रियो डि जनेरियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्वालीफाय केले आहे. दीपा असे करणारी देशातील पहिली  जिमनास्ट बनली आहे. 22 वर्षीय दीपा करमरकरने एकूण 52.698 पॉईंट्स कमावत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान नक्की केलं आहे. 
 
नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपमध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे दीपा करमरकरची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी हुकली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दीपा करमरकरला अगोदर रिझर्व्हवर ठेवण्यात आलं होतं. पण गेल्याच महिन्यात तिची निवड झाल्याचं कळवण्यात आलं होतं. 2014मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून दीपा करमरकरने अगोदरच इतिहास रचला होता. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत दाखल होणारी ती पहिला महिला जिमनॅस्ट होती.