शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

दुबई ओपनमधून अझारेंका आऊट

WD
येथे सुरू असलेल्या दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे अव्वल मानांकन देण्यात आलेली बेलारूसची स्टार टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाने टाचेच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

याच आठवड्यात सेरेनानेतिला अव्वल स्थानावरून पायउतार केले होते. आता या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सेरेनाला अव्वल स्थान पुन्हा बळकट करण्याची संधीच तिने दिली आहे.

यंदाच्या सत्रात दूर स्पर्धांमध्ये एकही पराभव न पत्करणारी अझारेंका ही आघाडीची एकमेव महिला टेनिसपटू आहे. तिने कतार ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाला तीन सेटमध्ये परभूत करीत विजेतेपद पटकावले होते, परंतु या स्पर्धेत मात्र तिला वेदनाशामक औषधे घेऊनच खेळावे लागले होते.