शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मेलबोर्न , मंगळवार, 17 जानेवारी 2012 (14:59 IST)

नदाल, क्लिस्टर्स यांची विजयी सलामी!

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा प्रारंभ झाला.

स्पेनच्या राफेल नदालने आपल्या ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेची यशस्वी सुरुवात करताना अलेक्स कुझनेत्सोव्हचा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर महिला गटातील गतविजेत्या बेल्जियमच्या किम क्लिस्टर्सने आपले विजेतेपद राखण्याच्या इराद्याने स्पर्धेची सुरुवात करताना पोर्तुगालच्या मारिया जाओ कोहलर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला.