गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (10:55 IST)

नदालला नमवून फेडरर अजिंक्य

बेसेल- तीन वर्षांच्या कालावधीनंतर रॉजर फेडररने राफेल नदालला नमवत बेसेल इन्डोअर टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

स्वित्र्झलडच्या 34 वर्षीय फेडररने नदालवर 6-3, 5-7, 6-3 असा विजय मिळवला. बेसेल स्पर्धेचे फेडररचे हे सातवे तर यंदाच्या हंगामातील सहावे जेतेपद आहे. तसेच हे त्याच्या खात्यावरील 88 वे विजेतेपद ठरले.