बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नोवाक, अझारेंका दुस-या फेरीत

WD
फ्रेंच ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीत वर्ल्ड नंबर १ नोवाक जोकोविच आणि महिला विभागात विक्टोरिया अझारेंकाने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. नोवाकने बेल्झियमच्या डेव्हिड गॉफिन तर बेलारूसच्या अझारेंकाने रशियाच्या एलेना वेस्निनावर मात केली.

सर्बियाच्या टॉप सिड नोवाकने गॉफिनवर ७-६, ६-४, ७-५ असा विजय मिळवला. आता पुढील फेरीत नोवाकची गाठ अर्जेंटिनाच्या गुईदो पेला विरूद्ध आहे. २०-१२ मध्ये नोवाक या स्पर्धेचा उपविजेता होता. अंतिम फेरीत त्याच्यावर नदालने मात केली होती. गतवर्षी गॉफिन शेवटच्या १६ क्रमांकात होता. परंतु त्याचा नोवाकसमोर निभाव लागला नाही. नोवाकने पहिला सेट टायब्रेकवर जिंकला. दुस-या सेटमध्ये एक ब्रेक घेवून नोवाकने २-१ अशी आघाडी घेतली होती. गॉफिनने नंतर ४-४ अशी बरोबरी साधून त्यानंतर नवव्या गेममध्ये नोवाकने आणखी एक ब्रेक घेवून दुसरा सेटही जिंकला.

तिस-या सेटमध्ये मात्र गॉफिनने झुंज दिली. अखेर नोवाकने हा सेटही ७-५ असा जिंकला.महिला एकेरीत अझारेंकाने एलेना वेस्निनावर ६-१, ६-४ अशी मात केली. पावसामुळे हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन अझारेंकाचा फ्रेंच स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न आहे. तिला ही स्पर्धा अजूनपर्यंत जिंकता आलेली नाही. या स्पर्धेची उपांत्यफेरीही तिला गाठता आलेली नाही. अझारेंकाने बेसलाईनवरून खेळ करुन एलेनाला नमवले. वेस्निनाने १३ अक्षम्य चुका केल्या. सध्या ती ३८ क्रमांकावर आहे.

रशियाची टेनिस खेळाडू स्वेतलाना कुजनेत्सोवाने फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत आपल्याच देशाच्या एकातेरीना मकारोवाला सरळ सेटमध्ये पराभूत केले. ३९व्या मानंकित कुजनेत्सोवाने मकारोवाला एक तास २९ मिनीटे चाललेल्या सामन्यात ६-४, ६-२ असे पराभुत करून दुसरी फेरी गाठली.कुजनेत्सोवा आपल्या कारकिर्दीत चौथ्यांदा मकारोवाचा सामना करत होती ज्यात त्यांनी तिस-यांदा मकारोवाला मात दिली.

कुजनेत्सोवा २००९ मध्ये फ्रेंच ओपन विजेता राहिले तसेच दुस-या फेरीत स्वेतलानाची लढत स्लोवाकियाच्या मेगदलेना रिवेरिकोवाशी होईल.मकारोवा २२वी मानंकित खेळाडू आहे तसेच फ्रेंच ओपनमध्ये तिने २०११ मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. तेव्हा ती स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहचण्यात यशस्वी राहिली होती.