शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: इंचियोन , शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (14:52 IST)

पहिल्याच दिवशी भारताची दोन पदकांची कमाई

दक्षिण कोरियात सुरु झालेल्या एशियन गेम्स 2014 मध्ये भारताने पहिल्याच दिवशी दोन पदकांची कमाई केली आहे. भारतीय शूटर्सने सुवर्ण पदक पटकावत विजयाचे खाते उघडले.

शूटर्स जितू राय याने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. जितू याने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. फायनलमध्ये जीतूनेला व्हिएतनामच्या एन्गुएन होंग फओंग आणि चीनच्या वांग झिवेई यांचे आव्हान स्विकारावे लागणार आहे.

दुसरीकडे, श्वेता चौधरीने कांस्य पदक पटकावले आहे. श्वेताने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक पटकावे.श्वेता आणि चीनच्या झाऊ दरम्यान कांस्य पदकासाठी शूट ऑफ झाले.

विशेष म्हणजे, ज्या पिस्टरने श्वेता नेहमी प्रॅक्टीस करते ती पिस्टल दक्षिण कोरियाच्या कस्टम विभागाने ताब्यात घेतल्याने नव्या पिस्टलने तीन स्पर्धेत भाग घेतल्यानंतरही पदक खिशात घातले आहे. श्वेता जगतील निशानेबाजांमध्ये 146 व्या क्रमांकावर आहे.