गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: रिओ दि जाने रो , सोमवार, 16 जून 2014 (11:54 IST)

पोर्तुगाल आणि जर्मनी दोन बलाढय़ संघात टक्कर

तीन वेळा विश्वविजेतेपद मिळविणार्‍या जर्मनी आणि बलाढय़ पोर्तुगाल संघात विसाव्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ‘ग’ गटाचा साखळी सामना खेळला जात आहे.

दोन्हीही संघ तुल्बळ असल्यामुळे या दोन संघात टक्करच होत आहे. या गटात घाना व अमेरिका हे संघही आहेत. फुटबॉल खेळाच्या महासत्तेतील एक संघ म्हणून जर्मनीची ओळख आहे. तीन वेळा विजेतेपद, चार वेळा उपविजेतेपद आणि चार वेळा तिसरे स्थान जर्मनीने मिळविलेले आहे.

पात्रता फेरीत 10 पैकी 9 सामने जिंकून जर्मनीने विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविले. मेसूत, ओझील, थॉमस मुलेर, मारियो गोत्से लुकास पोडलस्की आणि मिरास्लाव्ह क्लोज असे दिग्गज खेळाडू जर्मनीच्या संघात आहेत.

या खेळाडूंनी जर्मनीसाठी पात्रता फेरीत 36 गोल केले आहेत. जोकिम लो यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी कशी कामगिरी करेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोर्तुगालचा संघ सहाव्या वेळी विश्वचषक स्पर्धेस पात्र ठरला आहे. परंतु या संघातील खेळाडूंना त्यांच्या संघ पुढे येण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. ख्रिस्तियानो रोनाल्डो, हेल्डर पेल्हिगा, राऊल मिरेलस, ब्रुने अल्व्हेस, पेणे असे एकापेक्षा एक वरचढ खेळाडू या संघात आलेत, परंतु पोर्तुगालने एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. पोर्तुगालच्या संघाने 1966 साली तिसरे स्थान घेतले होते, ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. पोर्तुगालची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.

या दोन संघात सतरा सामने खेळले गेले असून जर्मनीने 9, पोर्तुगालने 5 जिंकले व तीन अनिर्णीत राहीले. जर्मनीने 25 तर पोर्तुगालने 16 गोल केले आहे.