शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 11 जून 2014 (13:29 IST)

फीफा विश्वचषकचे मुख्य फुटबॉल संघ

ब्राझीलच्या नावावर पाच विश्वचषक
ब्राझील :
 
12 जून पासून ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत यजमान ब्राझील हा विजेतेपदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात ब्राझीलचे नाव आघाडीस आहे. ब्राझीलने फिफाच्या पाच विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. आणि सर्वाधिक विजेतेपद त्यांच्याच नावावर आहेत. याशिवाय त्यांच्या नावावर 1950 आणि 1978 मध्ये उपविजेतेपद होते. 1938 व 1978 साली हा संघ तिसर्या   स्थानावर 1974 साली चौथ्या स्थानावर होता.

ब्राझील हे एकमेव राष्ट्र आहे की, ज्याने 19 पैकी 19 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. सर्वाधिक विजय आणि सर्वाधिक गोल ब्राझीलच्या नावावर आहेत. 1958, 1962, 1970, 1994, 2002 या साली ब्राझीलने स्पर्धा जिंकल्या होत्या.

पुढे पहा इटली संघ.... 

इटली  
 
ब्राझीलनंतर इटलीने चारवेळा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. अझुरीच्या इटली संघाने घरच्या मैदानावर या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी   फिफाची विश्वचषक स्पर्धा लागोपाठ दोनवेळा जिंकली आहे आणि असा पराक्रम करणारा तो एकमेव संघ आहे. इटलीने 1970 आणि 1994 साली उपविजेतेपद मिळविले होते. याशिवाय 1990 साली हा संघ तिसर्‍या आणि 1978 साली चौथ्या स्थानावर होता. इटलीने 19 पैकी 17 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. इटलीने 1936, 1938, 1982 व 2006 साली ही स्पर्धा जिंकली आहे.

पुढे पहा स्पेन संघ.... 
स्पेन  
 
दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली 2010 ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ही स्पेन संघाने जिंकली. हा संघ सोनेरी खेळाडूंच्या पिढीवर स्वार झाला होता व त्यांनी विजेतेपदाचा चषक पटकाविला. अंतिम सामना हा संस्मरणीय ठरला. नियोजित वेळ, जादा वेळ धरून 116 व मिनिटास आंद्रीस इनिएस्टा याने विजयी गोल केला. स्पेनने जोहान्सबर्गमध्ये नेदरलँडचा पराभव केला. स्पेनने या विश्वचषकात स्वीत्झर्लंडकडून एकमेव गोलने पराभव पत्करला. त्यामुळे  पहिला पराभव पत्करणारा संघ विजेतेपद मिळविणार पहिला संघ ठरला. स्पेनने त्यानंतर हुडरूरास, चिली यांच्यावर विजय मिळविला व दुसरी फेरी गाठली. त्यांनी पोर्तुलचा एकमेव गोलने पराभव केला व हा गोल डेव्हीड व्हीलाने केला होता. व्हीलानेच गोल करून उपान्त्पूर्व फेरीत पॅराग्वेला नमविले होते.

पुढे पहा अर्जेटिना संघ.... 
अर्जेटिना 
 
अर्जेटिनाच्या संघाने चारवेळा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामध्ये 1930 सालाच्या स्पर्धेचा समावेश आहे. 1930 साली उरुग्वेने अर्जेटिनाचा 4-2 ने पराभव केला होता. अर्जेटिना संघ हा जगातील एक सर्वात लोकप्रिय संघ आहे. अर्जेटिनाने दोनवेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे. घरच्या मैदानावर खेळताना 1978 साली मारिओ केम्पेसने अर्जेटिनाला गोल करून पहिले विजेतेपद मिळवून दिले. जादा वेळेत अर्जेटिनाने नेदरलँडचा 3-1 ने पराभव केला. 1-1 अशा बरोबरीनंतर अर्जेटिनाने हा विजय मिळविला. 37 व मिनिटास केम्पेसने केलेला गोल हा पंच डिक ननिगा याने अवैध ठरविला होता. त्यामुळे बरोबरी राहिली. परंतु केम्पेसने जादा वेळेत गोल करून संघाला विजयी केले. 1986 साली दिएगो मॅराडोना यांनी अर्जेटिनाला मेक्सिकोमध्ये दुसरा विश्वचषक मिळवून दिला.


पुढे पहा इंग्लंड संघ.... 
इंग्लंड
 
फुटबॉल असोसिएशनकरिता परिचित झालेला इंग्लंडचा फुटबॉल संघ हा जगातील सर्वात जुना संघ आहे. येथेच या खेळाचे बहुतांशी नियम विकसित झाले. 1966 साली चौरंगी विश्वचषक स्पर्धा भरविण्याचा त्यांना मान मिळाला. सोळा संघांचा सहभाग होता. इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली. ऐतिहासिक वेम्बले स्टेडियमवर इंग्लंडने पश्चिम जर्मनीचा अंतिम फेरीत पराभव केला. नियमित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाली होती. जादा वेळेत जेफ हर्स्ट यांनी तीन गोल करून हॅट्ट्रिक साधली. सुरुवातीस त्याने अठराव्या मिनिटास गोल करून जर्मनीविरुद्ध इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर त्यांनी जादा वेळेत दोन गोल केले. फिफा विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक साधणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचा दुसरा गोल हा मॅच रेफ्ररी कॉट फ्रेड डिअन्स्ट यांनी मंजूर केला.

पुढे पहा जर्मनी संघ.... 
जर्मनी 
 
जर्मनीच्या संघाने तीनवेळा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे आणि जगामधील सर्वाधिक यश मिळविणारा तो एक संघ ठरला आहे. हे तिन्हीही विजेतेपद पश्चिम जर्मनी संघाने जिंकले आहेत. परंतु दोन्ही जर्मनी एकत्र झाल्यानंतर त्यांना विजेतेपद मिळाले नाही. हा संघ चारवेळा उपविजेता ठरलेला आहे. 1954 साली पहिला विश्वचषक त्यांनी जिंकला. त्यावेळेला मिर्‍याकनल ऑफ बेर्न म्हणून ओळखला जात होता. त्यांनी 1974 आणि 1990 साली ही स्पर्धा जिंकली आहे. 1954 च्या अंतिम सामन्यात त्यांनी हंगेरीचा पराभव केला. हंगेरी त्याकाळी ऑलिम्पिक विजेता संघ होता. हेलमूठ राहन याने दोन गोल केल्यामुळे जर्मनीला हे पहिले विजेतपद मिळाले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये पिछाडीवरून पुढे येत जर्मनीने ही कामगिरी केली. हंगेरीच्या संघाकडे 2-0 अशी आघाडी असताना जर्मनीने त्यांचा पराभव केला.

पुढे पहा उरुग्वे संघ.... 
उरुग्वे  
 
1930 साली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भरविण्याचा बहुमान मिळविणारा उरुग्वेचा संघ पहिला विश्वचषक फुटबॉल विजेता संघ ठरला. त्यांनी अंतिम   सामन्यात अर्जेटिनाचा मोन्टेव्हीडीओ येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 4-2 ने पराभव केला. तत्पूर्वी 1928 साली त्यांनी लिम्पिक स्पर्धेत अर्जेटिनाचा पराभव केला होता. ऑलिम्पिक विजेता संघ म्हणून त्यांना स्पर्धेचे आयोजन मिळाले होते. 13 संघांचा या स्पर्धेत सहभाग होता. 20 वर्षानंतर ब्राझीलमधील खेळल्या गेलेल्या स्पर्धेत 1950 साली त्यांनी दुसरा विश्वचषक जिंकला. माराकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात उरुग्वेने ब्राझीलचा 2-1 ने पराभव केला होता. हा सामना माराकाना झो या नावाने प्रसिद्ध आहे. माराकाना ब्लो म्हणूनही हा सामना ओळखला जातो. फ्रिआका याने ब्राझीलचा पहिला गोल केला. परंतु जुआन अलबटरे आणि घिगीया यांनी एकेक गोल करून उरुग्वेला विजयी केले.

पुढे पहा फ्रान्स संघ.... 
फ्रान्स  
 
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा मायदेशी जिंकणारा फ्रान्स हा सहावा देश ठरला होता. तत्पूर्वी उरुग्वे, इटली, इंग्लंड, जर्मनी आणि अर्जेटिना यांनी मायदेशी स्पर्धा जिंकल्या होत्या. सोळाव्या स्पर्धेत फ्रान्सने ही कामगिरी केली. फ्रान्सने त्यांची मोहीम ही प्राथमिक फेरीतील सर्व साखळी सामने जिंकून सुरू केली. त्यांनी डेन्मार्क, सौदीअरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दुसर्‍या फेरीत हा संघ पराभवातून बचावला व जादा वेळेत फ्रान्सने उरुग्वेचा एकमेव गोलने पराभव केला. लॉरेन्ट ब्लँकने हा गोल्डन गोल केला. त्यानंतर त्यांनी उपान्त्पूर्व फेरीत इटलीला नमविले. जादा वेळ संपल्यानंतर पेनाल्टी शूटआऊटमध्ये  फ्रान्स विजयी झाला. उपान्त्य फेरीत क्रोएशिाचा 2-1 ने पराभव केला. अंतिम सामन्यात जिनेदिने झिदाने याला सूर गवसला आणि फ्रान्सने ब्राझीलचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली.