गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

फुटबॉल : भारताला यजमानपद

PR
भारतीय फुटबॉल रसिकांना टॉप क्लास फुटबॉलचे दर्शन घडणार आहे.‘फिका’ ने १७ वर्षाखालील विश्व कप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले आहे. ही स्पर्धा २०१७ मध्ये होईल.

यजमानपदाच्या शर्यतीत भारताने आयर्लंड, २०१० ची विश्व स्पर्धा आयोजित करणारा द. आफ्रिका आणि उझबेकिस्तान यांचे आव्हान मोडून काढले. ‘फिका’ च्या कार्यकारी समितीने ब्राझीलमधील कोस्ट डो साऊपे येथे ही घोषणा केली. भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असून या क्षणाची आम्ही वाट पहात होतो असे अ. भा. फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले. हा निर्णय क्रीडासंबंधी राजकीय आणि भौगोलिक दृष्टिकोनातून घेण्यात आला असे ‘फिका’ चे अध्यक्ष सेप ब्लॅटर म्हणाले. या स्पर्धेत २४ संघ सहभागी होतील. स्पर्धेतील ६ ठिकाणी खेळवण्यात येतील. नवी दिल्ली, गोवा, बंगलोर, पुणे, मुंबई, कोलकाता, कोची आणि गुवाहाटी यातून सहा शहरांची निवड करण्यात येईल. केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले, अशा प्रकारची मोठी स्पर्धा आयोजित केल्याने भारतीय फुटबॉलला चालना मिळेल. सध्या भारतात अनेक ठिकाणी फुटबॉल लोकप्रिय आहे.

जानेवारीमध्ये ‘फिका’ ने भारताची प्रवेशिका प्रथम नाकारली होती. कारण त्यावर सरकारची आवश्यक हमी नव्हती. ‘फिका’ ने सेक्युरिटी, करमाफी, परकीय चलन स्त्रोत, वाहतूक व्यवस्था व खेळाडूंची निवास व्यवस्था यासंबंधीची पूर्तता करण्यास सांगितले होते. सुमारे महिनाभर सरकारकडे पाठपुरावा करून पटेल यांनी आवश्यक ती हमी घेण्यात यश मिळवले. नोव्हेंबरमध्ये ‘फिका’ कडे कागदपत्रे सादर करण्यात आली. क्रीडा मंत्रालयाने स्टेडियम सुधारणा करण्यासाठी ९५ कोटींचा आराखडा तयार केला आणि २५ कोटीचा अतिरिक्त निधीही मंजूर केला. स्पर्धेचा मूळ खर्च एआयएफएफ आणि फिका सहन करणार आहेत. १९८५ मध्ये चीनमध्ये पहिली स्पर्धा झाली ती नायजेरीयाने जिंकली. नायजेरीयाने हा विश्वकप १९८५, ९३, ०७ आणि ०१३ अशी चार वेळा जिंकली आहे. ब्राझीलने तीन वेळ या चषकावर हक्क सांगितला आहे. विश्व स्पर्धा दोन वर्षाला होते. २०१३ ची स्पर्धा नायजेरीयाने जिंकताना अबु धाबीत मेक्सीकोवर ० अशी मात केली होती. २०१५ ची स्पर्धा चिलीमध्ये होणार आहे. आतापर्यंत चीन, जपान, द. कोरिया आणि संयुक्त अरब अमीरातीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. १९८९ मध्ये सौदी अरेबियाने ही स्पर्धा जिंकली होती. विश्व स्पर्धा जिंकणारा तो एकमेव आशियायी देश ठरला.