शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

बेकहॅमने घेतला 400 कोटींचा बंगला

WD
फुटबॉलच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणणारा डेव्हिड बेकहॅम हा इंग्लंडचा सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. फुटबॉलच मैदानावरील निवृत्तीनंतर आपले आयुष्य आरामात जगता यावे यासाठी बेकहॅमने पश्चिम लंडन येथे एक चार मजली बंगला तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून विकत घेतला. या नवीन घराच्या डागडुजी व रंगरंगोटीसाठी बेकहॅमने 50 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या घराचे वैशिष्टय़ म्हणजे या घरामध्ये बेकहॅम व त्याची पॉप स्टार पत्नी व्हिक्टोरिया यांच्यासाठी विशेष सलून व स्पा असणार आहे. तसेच पत्नी व्हिक्टोरियाच्या बुटांसाठी एक वेगळी खोली असेल. या आलिशान बंगल्यात बेकहॅमने बसवलेल्या साउंड सिस्टीममुळे सर्व खोलंमध्ये गाणी ऐकू जाणार आहेत. या साउंड सिस्टीमवर संगणक किंवा मोबाइल फोनच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच प्रत्येक बाथरुममध्ये वॉटरप्रूफ प्लाझ्मा टीव्हीही लावणचा बेकहॅम व त्याची पत्नी विचार करत आहे.

या नवीन घराच तळमजल्यावर अभ्यासाठी खास खोली, जिम, मसाज रुम, तीन सर्व्हिस रुम आणि एक सुंदर गार्डन असणार आहे. तर बंगल्याच्या तळघरामध्ये गॅरेज आहे. तसेच बेकहॅमच्या चार मुलांसाठी दुसर्‍या मजल्यावर खास खोल्या बनवण्यात आल्या आहेत. बेकहॅम व व्हिक्टोरियाने त्यांच्या ‘बॅकिंगहॅम पॅलेस’ म्हणून ओळखला जाणारा ‘हार्डफोर्डशावर होम’ हा बंगला नुकताच 1200 कोटी रुपयांना विकला आहे. तसेच बेकहॅमचे कॅलिफोर्निया, दुबई आणि दक्षिण फ्रान्समध्ये बंगले आहेत. निवृत्तीनंतर ब्रिटनमध्ये स्थायिक होऊन आपल्या मुलांचे शिक्षण ब्रिटनमध्येच व्हावे अशी बेकहॅम पति-पत्नीची इच्छा आहे.