बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

भारतीय टेनिसचे नवे पर्व

भारत-न्यूझीलंड डेव्हिस कप स्पर्धा आजपासून

WD
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शुक्रवारपासून डेव्हिस कप टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. एकाही स्टार खेळाडूशिवाय मैदानात उतरणार्‍या भारतीय संघातील युवा खेळाडूंची या स्पर्धेत अग्निपरीक्षा होणार असून ही स्पर्धा म्हणजे भारतीय टेनिसमधील नव्या पर्वाचा प्रारंभ म्हणूनच समजली जात आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रभावी कामगिरी करणारे विष्णू वर्धन व २0 वर्षीय युकी भांबरी भारतीय संघाचे आव्हान स्वीकारतील. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी संघाची निवड प्रक्रियेवरून वादविवाद करणारे लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपन्ना आणि सोमदेव देववर्मन यांना संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे या नव्या युवा ब्रिगेडसाठी न्यूझिलंड संघाविरुद्धचा हा सामना सोपा नसेल. प्रत्येक देशाचे वरिष्ठ खेळाडू जेव्हा नवृत्तीच्या मार्गावर असतात तेव्हा युवा खेळाडूंवर जबाबदारी सोपविली जाते. पण, भारतीय संघात हा बदल एवढा समाधानकारक नाही.

पेस आणि खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला सोमदेव डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या पुढील लढतीत संघात असतील. भूपती व बोपन्ना यांच्या निवडीबाबत शंका आहे. कारण त्यांना यावेळी ऑलिम्पिकच्या निवडीदरम्यान झालेल्या वादामुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. दोघांनी ऑलिम्पिकमध्ये पेसबरोबर खेळण्यास नकार दिला होता. राष्ट्रीय टेनिस महासंघ (एआईटीए) भूपती, बोपन्ना यांना संघाबाहेर ठेवून युवा खेळाडूंना संधी देऊन जोखीम घेण्यास तयार होते. कारण न्यूझिलंडचा संघसुद्धा एवढा बलवान नाही. मानांकन व सध्याचा खेळाडूंची कामगिरी लक्षात घेता भारतीय संघाचे पारडे भारी आहे.