बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , मंगळवार, 22 नोव्हेंबर 2011 (13:22 IST)

भारतीय हॉकीपटूंना मिळणार भरघोस बक्षिसे

विश्व हॉकी सीरिजमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय हॉकीपटूंसाठी संयोजकांनी विविध स्पर्धांसाठी भरघोस रकमेची बक्षिसे देण्याचे जाहीर केले आहे. निम्बस स्पोर्टस आणि इंडियन हॉकी फेडरेशन या दोन संस्‍था विश्व हॉकी सीरिजच्या संयुक्त संयोजक आहेत.

या ‍सीरिजमध्ये खेळणार्‍या खेळाडूंनी पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकसाठी होणार्‍या पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवल्यास त्यांना पाच लाख रुपये मिळणार आहेत. जर भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक पटकावले तर 50 लाख रुपये खेळाडूंमध्ये वाटण्यात येतील. ही रक्कम रौप्यसाठी एक कोटी तर सुवर्ण पदकासाठी दोन कोटी होणार आहे.