गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: भोपाळ , बुधवार, 4 मार्च 2009 (10:12 IST)

मध्यप्रदेशातील 70 खेळाडूना पुरस्कार

मध्यप्रदेश सिव्हील सर्विसेज क्रीडा मंडळ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात 70 कर्मचारी खेळाडू व कलाकाराना क्रीडा व युवा कल्याण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती रंजना चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.

पुरस्कार स्वीकारणार्‍यामध्ये मुख्यमंत्री यांचे सचिव अनुराग जैन यांचा ही समावेश होता. कार्यक्रमात 2005- 06, 2006-07 व 2007-08 या वर्षात म.प्र.सिव्हील सर्विसेज क्रीडा स्पर्धा व इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजयी कर्मचारी खेळाडू व कलाकार यांना पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.