मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: टोकियो , शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2011 (13:05 IST)

मरे, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

अव्वल मानांकित स्पेनचा राफेल नदालने कॅनडाच्या मिलोस राओनिकला आज येथे ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करीत जपान ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गतचॅम्पियन नदालला २0 वर्षीय राओनिकने पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज दिली; परंतु, निर्णायक क्षणी त्याने दुहेरी चुका केल्या. त्याचा नदालने पुरेपूर लाभ उठवताना पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसरा सेट तर त्याने सहज जिंकत अंतिम आठमधील तिकीट पक्के केले. गिराल्डोने रशियाच्या दमित्री तुसरुनोव्हचा ६-४, ७-६ असा पराभव केला. द्वितीय मानांकित इंग्लंडच्या अँडी मरेने अमेरिकेच्या एलेक्स बोगोमोलोव्ह ज्युनिअर याचे आव्हान ६-१, ६-२ असे एका तासातच संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. मरेची पुढील फेरीतील लढत अर्जेंटिनाच्या डेव्हिड नालबँडियन आणि क्रोएशियाच्या इवान डोडिग यांच्यात विजयी खेळाडूशी होईल