गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , मंगळवार, 31 जुलै 2012 (14:30 IST)

महाग पडले स्नान, तुटले पदक

PR
FILE
लंडन ऑलिम्पिकमध्ये जुडो स्पर्धेत कास्य पदक जिंकणार्‍या फेलिप कितेदाई चे पदक स्नान करताना तुटले. ब्राझिलच्या कितेदाई याने ६० किलो गटात शनिवारी इटलीच्या एलियो वेर्दे यांस पराभूत करून कास्य पदक जिंकले होते.

खुशीत तो पदक घालूनच स्नान करण्यासाठी गेला. स्नान करताना पदक खाली पडले त्याने ते परत गळ्यात घातले आणि झोपावयास गेला. पदक पडल्याने तुटल्याचे त्याच्या नंतर लक्षात आले. पदक रिबन बांधण्याच्या जागी तुटले आहे.

कितेदाईने माफी मागितल्यानंतर ऑलिम्पिंक अधिकारी त्यास नवीन पदक देण्यास तयार झाले आहेत.